माझी शिलाई मशीनची सुई वारंवार का तुटते? त्यामागची सामान्य कारणे आणि ती टाळण्याचे उपाय.
शिवणकाम करताना सुई अचानक तुटण्याइत की चीड आणणारी दुसरी गोष्ट नसेल. सुई तुटल्यामुळे फक्त कामात अडथळा येत नाही, तर कपडा खराब होऊ शकतो आणि कधीकधी इजा होण्याची भीतीही असते. पण घाबरण्याचे कारण नाही! काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही ही समस्या सहज सोडवू शकता.
या ब्लॉगमध्ये आम्ही अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांने तुमची सुई तुटणार नाही आणि शिवणकामही उत्तम होईल.
१. नेहमी योग्य आकाराची सुई वापरा

सुई तुटण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. तुमच्या कपड्यानुसार सुईचा नंबर निवडा.
- जाड कपडा (उदा. डेनिम): १८ नंबरची सुई वापरा.
- पातळ कपडा (उदा. शिफॉन): १ ४ नंबरची सुई वापरा.
- घरगुती हॉफ शटल मशीन: half-shuttle M/C HA X 16 (सपाट डोके असलेली सुई).
- डबल फाटा (Peiko & full-shuttle) मशीन: full shuttle M/C dbX16 (गोल डोके असलेली सुई).
जर तुम्ही जाड कपड्यासाठी बारीक सुई वापरली, तर ती नक्कीच तुटणार. त्यामुळे कपडा आणि सुई यांची जोडी नेहमी योग्य असावी.
२. मागच्या बाजूने कपडा ओढू नका

शिलाई करताना कपडा जोरात ओढल्यामुळे सुई छिद्रात जाण्याऐवजी खालच्या लोखंडी प्लेटवर (needle plate) आदळते आणि तुटते. त्यामुळे कपडा कधीही ओढू नका. यंत्रातील ‘फीड डॉग’ला त्याचे काम करू द्या. तुमचे हात फक्त कपड्याला दिशा देण्यासाठी वापरा, ओढण्यासाठी नाही.
३. सुई व्यवस्थित बसवा

सुई चुकीच्या पद्धतीने बसवली तर ती तुटणारच. सुई बसवताना ती सुई बारच्या आत (needle bar) शेवटपर्यंत वर ढकला आणि मगच स्क्रू घट्ट करा. तसेच, SV घरगुती हॉफ शटल मशीन साठी सुईची चपटी बाजू नेहमी योग्य दिशेला (सहसा मागच्या बाजूला) असेल याची खात्री करा. डबल फाटा (TA1/
४. नेहमी दर्जेदार सुई वापरा

कमी दर्जाची सुई लवकर तुटण्याची भीती असते. सुई चांगली आहे की नाही हे ओळखण्यासाठी या गोष्टी तपासा:
सुईचे छिद्र: छिद्र गुळगुळीत असावे, त्याला कुठेही खरखरीत कडा नसाव्यात.
लवचिकता: दर्जेदार सुई थोडी लवचिक असते. ती लगेच वाकत नाही, तर हलका दाब दिल्यावर पुन्हा सरळ होते.
५. मशीनमध्ये नेहमी योग्य प्रकारे दोरा ओवा.

जर दोरा व्यवस्थित ओवला नसेल, तर मशीन शिलाई चालवतना दोरा जोरात खेचते. यामुळे सुई वाकू शकते किंवा तिची दिशा बदलून ती मशीनच्या प्लेटवर किंवा ‘प्रेशर फूट’वर आदळून तुटू शकते.
उपाय: जर सुई वारंवार वाकत असेल, तर वरचा दोरा आणि बॉबिनचा दोरा पूर्णपणे काढून पुन्हा एकदा व्यवस्थित ओवा.
या सर्व सल्ले पालन करूनही जर सुई वारंवार तुटतच राहिली, तर तुमचे मशीन सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जा किंवा एखाद्या मेकॅनिकला दाखवा.
